0
BY - प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
डंपरने बाईकला दिलेल्या धडकेमध्ये एकाच कुटुंबातील चिमुरडीसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली खंबाळपाडा परिसरात घडली आहे. गणेश चौधरी, उर्मिला चौधरी, 4 वर्षाची हंसिका चौधरी अशी या अपघातात एकाच कुटुंबातील मृत्युमुखी पडलेल्यांची नाव असून ओम चौधरी हा 2 वर्षांचा चिमुरडा या अपघातात सुदैवाने बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत. तर दुसऱ्या अपघातात डोंबिवलीच्या घरडा सर्कल येथे कल्याणातील प्रभाकर ठोके यांचा मृत्यू झाला असून पेशाने शिक्षक असणारे ठोके सर सकाळी शाळेत जात असताना त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अशा निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे

Post a comment

 
Top