0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
मुरबाड कल्याण रोडवरील बिर्लागेट येथिल ट्रॉफिक पोलिसांचा दिवसेंदिवस आपला मनमानी प्रकार करण्यात महाकारनामा करित असल्याचे समोर आले आहे.वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडून नागरिकांच्या गाडया बाजूला घेऊन नागरिकांना त्रास दिले जात आहेत.मोठ मोठया गाडयांना अडवून त्यांच्याकडून दंडाच्या नावाखाली वसुली केली जात आहे.पत्रकारांच्या गाडया अडवून पत्रकारांना आरेरावीची केली जात असून गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे याकडे ट्रॉफिक पोलिसचे पोलिस निरक्षिक यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांची व पत्रकारांची ट्रॉफिक पोलिसांशी भांडणे देखील होत असतात.
मुळ कागदपत्रे न पाहता गाडया बाजुला घेतल्या जातात व ब्रिजवरील वाहतूक कोंडी जशीच्या तशीच राहतात.ट्रॉफिक कमी करण्याचे काम न पाहता यांच्याच हलगर्जीमुळे वाहतूक कोंडी ही होत असते याविषयी ज्येष्ठ पत्रकार श्री.नामदेव शेलार यांनी थेट कल्याण आर.टी.ओ यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही या वाहतूक कोंडीची दखल आता पोलिस महासंचालकांनी घेऊन मनमानी करणार्‍या पोलिसांवर चाप बसवावा वाहतूक वर्दल कमी करण्याच्या उद्देशाने थेट मुंबर्इ पोलिस महासंचालक यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
            बिर्लागेट ब्रिज हा मुख्य कल्याणला जोडणारा रस्ता असून या ब्रिजवर हजारो वाहाने दिवसातून ये जा करत असतात.वाहतूक दूर करण्याऐवजी गाडया रोडावरच थांबविल्या जातात.सर्वत्र कागदपत्रे असतानाही नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याच भागात मोठया प्रमाणात अवैध धंदे होतात याकडे लक्ष केंद्रीत केले जात नाही परंतू गाडया अडवून त्रास देणे,त्यांच्याकडून वसुली करणे हे बरोबर जमत असल्याने येथिल नागरिकांच्या व  प्रवाशांच्या मनात पोलिस प्रशासन विरोधकच बनत चालले आहे.वारंवार पत्रकारांनाही याच ट्रॉफिक पोलिसांना आम्ही शासनाचे पत्रकार असुन कागदपत्र बरोबर असल्याचे सिध्द करावे लागत आहे.मनमानी प्रकार केला जात असून आरे तुरे ची भाषा वापरली जाते.तेच नगरसेवक,आमदार,खासदारांच्या गाडया अदविले जात नाही आणि सर्वसामान्य असेल तर गाडया बाजुला घेतल्या जातात मग अशा पोलिसांना पारदर्शक प्रशासक म्हणावं का ? अधिकारी खुर्चित ऑफिसमध्ये बसला असतो आणि हवलदार गाडया पकडून वसुली करतो ही खेदजनक बाब असल्याने राज्याच्या पारदर्शक मुख्यमंत्री,ठाणे पोलिस अधिक्षीक,कल्याण आर.टी.ओ अधिकार्यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.
कल्याण आर.टी.ओ दोन दिवस असते तर 5 दिवस नसते याचा फायदा ट्रॉफिक हवालदार घेत आहे.पत्रकारांना दमदाटी केली जात असून पोलिस असल्याचा धाक दाखवला जातो.गाडी थांबविण्याचे कारण पत्रकारांनी विचारले असता साहेब समोर आहेत असे केविलवाणा उत्तर दिले जाते.यांच्या समोर प्रवाशी नागरिक आणि पत्रकार असतात का इतर अवैध चालणार्‍या गाडया दिसत नाहीत का ?  कालीपिली जीभ मध्ये कोंबून कोंबून प्रवाशांना कल्याण मुरबाडकडे नेले जात असताना कुठे जातो प्रशासन ? कुठे जाते ट्रॉफिक आणि कुठे जाते तपासणी याकडे पोलिस अधिक्षीक ठाणे यांनी आवर्जुन लक्ष घातले पाहिजे.बेकायदेशीर रिक्षा,कालीपिली जीभ धावतात त्यांच्यावर कारवार्इ करण्यात अपयशी ठरलेल्या आणि हप्तेबाजीत बांधलेल्या कल्याण आर.टी.ओ तसेच ट्रॉफि पोलिसांवर कणखर प्रशासक केव्हा लाभेल जेने करून यातील भ्रष्टाचार थांबेल या प्रतिक्षेत आता खरी जनता आहे.

Post a comment

 
Top