0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे पर्यावरणस्नेही स्थानके उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेमार्गावर पर्यावरणपूरक यंत्रणा आणण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील 15 स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता लोकांना आवश्यक स्थितीमध्ये मोबाइल चार्जिंग (solar energy mobile charging service on western railway) करता येणार आहे.प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरील 15 स्थानकांत 24 तास विनामूल्य चार्जिंग सेवा उपलब्ध होणार आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल चार्जिंग पॉइंटमध्ये एका वेळी 8 फोन चार्जिंग करता येणार आहे. तर, एका दिवसात 100 पेक्षा जास्त फोन चार्ज होऊ शकतात.

Post a comment

 
Top