0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बीड |
औरंगाबाद-मुखेड या एसटी बसची व जीपची समोरासमोर धडक झाली. यामध्ये 3 जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील चंदन सावरगाव जवळ घडली. या घटनेत 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथून मुखेडकडे निघालेली एसटी बस क्र.(एम.एच.२० बी.एल.३७२१) या बसचा आणि बोलेरो पिकअपचा भीषण अपघात झाला. हा अपघात तिहेरी असल्याचा सांगण्यात येते. सदरच्या अपघातामध्ये बसमधील तिघेजण जागीच ठार झाल्याचे सांगण्यात येते. अपघातात १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींना स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची व जखमींची नावे अद्याप पर्यंत कळलेली नाहीत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Post a comment

 
Top