0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – राजस्थान  |
देशभरात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतेच हैदराबाद येथे एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. त्यानंतर आता राजस्थानमध्येही एका तरुणीवर सलग 12 तास गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील जयपूर येथे ही घटना घडली. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून जयपूर पोलिसांनी हे प्रकरण दाबून ठेवले होते, असा गंभीर आरोप केला जात आहे. पीडित तरुणीला तीन दिवसांपूर्वी जवाहरलाल सर्कल येथून तिच्या मित्राने जबरदस्ती गाडीत बसवले. यावेळी अजून एक मित्र तेथे आला आणि गाडीत बसून मद्यपान करु लागला.
या गाडीतून आरोपींनी पीडितेला रात्रभर फिरवले. त्यानंतर तरुणीला कालवाड परिसरात घेऊन गेले. या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कालवाडमध्ये जेव्हा गाडीचे डिझेल संपले. तेव्हा गाडी पेट्रोल पंपावर घेऊन गेले. तेव्हा तरुणीने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या मदतीने पोलिसांना फोन केला. पण पोलिसांनी हा विभाग आमच्या हद्दीत येत नाही असे कारण देत तक्रार घेण्यास नकार दिला, असं सांगितलं जात आहे.

Post a comment

 
Top