0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अंबरनाथ |
अंबरनाथ येथील डॉक्टर बी. जी. छाया रुग्णालयात थंडी आणि ताप या आजारांवर उपचार घेणाऱ्या 12 रुग्णांना चुकीचे  इंजेक्शनमुळे दिल्यामुळे बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली.  काही जणांनी रक्ताच्या उलट्याही झाल्या. प्रकृती गंभीर असल्यामुळे काही रुग्णांना पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोघांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णांना एक्सपायरी झालेली औषधं दिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोणी दोषी आढळल्यास कारवाई करू अशी अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी दिली आहे. 

Post a comment

 
Top