0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबईत मोकाट फिरणाऱ्या गाई, बैल, म्हैस आदींच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांनाच नव्हे तर वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल मुंबई महानगर पालिकेने घेतली आहे. त्यासोबतच मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरील दंडात्मक कारवाईचा बडगा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मोकाट जनावरांच्या मालकांकडून प्रति जनावर 10 हजार रुपये दंड आकारण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाय-बैलांना बांधून ठेवले जाते. शेण आणि गोमूत्रामुळे पदपथावर अस्वच्छता होते. दररोज सकाळी काही महिला गाय आणि चाऱ्याची टोपली घेऊन मंदिराजवळ अथवा सार्वजनिक ठिकाणी बसून असतात. गाईला चारा भरविण्याच्या निमित्ताने भाविक मंडळी तेथे गर्दी करतात. त्यानंतर दुपारच्या वेळी या महिला गाईंना घेऊन निघून जातात. मात्र गोठ्याच्या दिशेने निघालेल्या गाई मोकाट सुटतात आणि त्यांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

Post a comment

 
Top