BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र
लाइव – भिवंडी |
माहिती अधिकारात भिवंडी तहसिलदार यांना बेकायदेशीर दगड खानी उत्खननाची माहिती विचारली असता माहिती अधिकारात माहिती दिली नसताना भिवंडी तहसिलदार कार्यालयात नागरिकांना लूटण्याचा नवा फॉर्मुला महाप्रताप कारनामा निदर्शनास आले आहे.भिवंडी तहसिलदार अंतर्गत
सेतूमध्ये नागरिक,शेतकरी,विद्दयार्थी यांच्या विविध उपयोगी दाखला मागणीसाठी फॉर्म घेण्यास येत असतात याकडे चांगलीच लूटशाही सेतू फॉर्म विक्रेत्याकडून होतांना आम्ही गुप्तचर
केलेल्या पाहणी दरम्यान निदर्शनास आले आहे.नागरिक म्हणून आम्ही त्यांना आपला शासकीय फॉर्म शासकीय
किंमतीचा बॅनर लावला नसल्याची विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देत तुम्ही आमच्या
विरोधात अर्ज करा काही निष्पण होणार नसल्याचे सेतूमधील एका फॉर्म विक्रेत्यानी सांगितले.अशा
प्रकारची उत्तरे जर आम्ही सामान्य नागरिक म्हणून गेलो आणि मिळाली तर खर्या शेतकरी,शालेय
विद्दयार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना कशा पध्दतीने उत्तरे देऊन लूटमार करित असतील याचा
अंदाज लावणे कठीण नाही.अधिकारी व्यवसायीकांना खुर्चीत घेऊन बसतो आणि सर्वसामान्यांना
बाहेर जाऊन थांब असे सांगून प्रतिक्षा करण्यास सांगतो तो नागरिक बाहेरच प्रतिक्षेत
थांबतो तरीही त्याच्याकडे लक्ष केंद्रीत केले जात नाही असा महाप्रताप नायब तहसिलदार
चौधरी यांचा आहे.
शेकडो दाखले या सेतूच्या माध्यमातून भिवंडी तहसिलदार कार्यालयातून
दिले जाते परंतू सेतूच्या लूटीच्या धंदयाकडे तहसिलदारांना वेळच मिळत नाही.चालतंय आणि
खातायं ना मग खाऊद्दया असा पाठिंबा सध्या सेतूच्या फॉर्म विक्रेत्याला दिला जात आहे.भिवंडीतील
सेतू विभागात जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून फॉर्म व शासकीय फी असा फलक लावण्याचे आदेश
व्हावे अशी मागणी मुरबाड विकासमंच व विविध सामाजिक संघटनेने केली आहे.भिवंडी तहसिलदारांनी
या गंभीर विषयाकडे लक्ष केंद्रीत करून नागरिकांची लूटमार थांबवावी तसेच ज्याची किंमत शासकीय प्रमाणे घेण्याचे शासनाने म्हंटले आहे त्याबाबत
शुल्क आकारण्याच्या सुचना द्दयावेत तसेच 10 ते 15 रूपयाच्या फॉर्मवर 30 रू घेणे बंद
करून संबधितावर शुल्क आकारण्याविषयी कारवार्इ करून लुटमार थांबवून शासकीय दाखले सेवा
नागरिक,शालेय विद्दयार्थी,ज्येष्ठ नागरिक,शेतकर्यांना तात्काळ मिळाव्यात अशी मागणी
जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडे करण्यात आली आहे.
Post a comment