0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - जळगाव |
मल्टी प्रपोज फाऊंडेशनच्या वतीने जळगाव येथिल जामनेर तालुक्यातील खादगाव येथिल जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्याचबरोबर शैक्षणिक दृष्टीकोनाच्या माध्यमातून यशस्वी वाटचालीविषयी विशेष आणि उत्तम असा संवाद यावेळी साधण्यात आला.लहान मुलं लहान वयातच व्यसनाकडे वळू नये म्हणून या फाऊंडेशनच्या माध्यमातून वैचारिक विचार मांडण्यात आले.
यावेळी डॉ.ऐश्‍वर्या राठोड यांच्या विशेष योगदानातून या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठया संख्येने विद्दयार्थी वर्ग उपस्थित होते.कार्याची सांगता क्रियाशैलीतून हवी याची बाजू पाहता एक क्षण लहान मुलांच्या पुढिल भविष्यासाठी असा संदेश यावेळी आपल्या संभाषणातून डॉ.ऐश्‍वर्या राठोड यांनी दिले.या शिबीराला अप्रितम साथ मिळाले असून त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र जळगाव जिल्हयातुन चर्चा होत आहे.


Post a comment

 
Top