0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो गोत्यात येण्याची शक्यता आहे. स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे बिग बींनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता.  ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते.
ए. महाराणा प्रताप
बी. राणा सांगा
सी. महाराजा रणजीत सिंह
डी. शिवाजी
प्रश्नाचे पर्याय वाचताना अमिताभ बच्चन यांना ही चूक दुरुस्त करता आली असती, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन प्रेक्षकांसह अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन ‘केबीसी’ने अपमान केला आहे. लवकर माफी मागा नाही तर शो ची एक पण lifeline राहणार नाही !! असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी अमिताभ बच्चन यांना दिला आहे.

Post a comment

 
Top