0
BY - प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती बघता स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी कर आणि थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्यावर्षी 350 कोटी थकबाकी होती त्यामधून 90 टक्के वसुली करण्यात आली होती.या वर्षी 470 कोटी असून त्यापैकी 173 कोटी आत्तापर्यंत वसूल करण्यात आले आहेत. पण मार्च अखेरपर्यंत उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. तसेच 1200 व्यावसायिक गाळे थकबाकी असल्यामुळे सील करण्यात आले असून ज्यांनी ज्यांनी चेक बाउन्स केले आहेत अशा 130 जणांवर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आणि लवकरच महानगर पालिका हद्दीतील 100 मोठे थकबाकीदार यांची नावे वृत्तपत्रातून देखील जाहीर करण्यात येणार आहेत जेणेकरून ते लवकरात लवकर आपला थकित कर भरतील आणि त्यासाठी आम्ही कायदेशीर पद्धतीने देखील प्रयत्न करणार असल्याचे सभापती म्हात्रे यांनी सांगितले.

Post a comment

 
Top