0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
" मनी धरू एकच ध्यास- समाजाचा करू विकास " या प्रेरणेतून शेलारमामा फाऊंडेशन शेलार परिवार हे संपुर्ण महाराष्ट्रभर समाजकार्य करत आहे.गोर-गरीब जनतेला मदत व त्याना शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून देण्याचा काम हा फाऊंडेशन करणार आहे व करत आहे. शेलार मामा फाऊंडेशन शेलार परिवाराची पाहिली सभा नालासोपारा येथे पार पडली.या सभेला सुरूवात करण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज व शेलार मामा यांच्या फोटोला हार घालून त्यांना अभिवादन करून सुरूवात करण्यात आली. सरदार शेलारमामा यांचा इतिहास आजच्या काळात पण लोकांनसमोर ठेवण्याचा काम हा फाऊंडेशन करत आहे.दर दोन ते तीन महिन्याला एक सभा,शेलार परिवार मेळावा व दरम्यान शेलारमामांचा इतिहासाची माहिती सांगितली जाणार असल्याचे या फाऊंडेशनचे सदस्य-सभासद सागर शेलार यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.सभेला शशिकांत शेलार (दापोली,रत्नागिरी),विजय शेलार (कुसापुर,भिवंडी), राहुल शेलार (चिंचवली,भिवंडी), रविंद्र शेलार (पाटण,सातारा),अंकुश शेलार (पाटण सातारा) व अन्य शेलारमामा वंशज मावळे उपस्थित होते.

Post a comment

 
Top