0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विमानतळावर फोन करुन एका माथेफिरु व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना (Nagpur airport to kill cm devendra fadnavis)जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून सध्या नागपूर पोलिस याबाबतचा अधिक तपास  करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर एका माथेफिरु व्यक्तीने एअर इंडियाच्या काऊंटरवर फोन केला. यावर माझ्या नातेवाईकांना विमानाने पोहचता आले नाही, असे सांगत ही धमकी दिली आहे. जर माझे नातेवाईक सुरक्षित आले नाहीत. तर मी मुख्यमंत्र्यांच्या जीवाचे बरं-वाईट करेन असेही या माथेफिरुने फोनवर म्हटलं आहे.याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर विमानतळावर अशाप्रकारे फोन आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा माथेफिरु नेमक कोण होता, त्याने हा फोन का केला, त्याचे नातेवाईक नक्की कोणत्या विमानाने येणार आहेत. याबाबतच तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

Post a comment

 
Top