0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून राज्याला नवे सरकार मिळणार असे वाटत असताना शनिवारी सकाळी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या. राजभवनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार पडलेल्या शपथविधीविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर रविवारी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी सुरु झाली. यावेळी राष्ट्रवादीकडून युक्तीवाद करताना सिंघवी म्हणाले की, शुक्रवारी सात वाजता सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीनं केली होती. उद्धव ठाकरे हे या सरकारचं नेतृत्व करणार होते. असे असताना राज्यपाल वाट बघू शकत नव्हते का?, असा प्रश्न सिंघवी यांनी उपस्थित केला.
यावेळी मुकूल रोहतगी म्हणाले की, राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही, तसेच कलम ३६१ नुसार कोर्टाला राज्यपाल उत्तरदायी नाहीत. जर तुमच्याकडे बहुमत होतं तर तुम्ही सत्ता स्थापन करायची होती, किंवा फ्लोर टेस्टची मागणी करु शकता, अशी माहिती मुकूल रोहतगी यांनी यावेळी दिली.पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यपालांच्या निर्णयावर न्यायीक समीक्षा होऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टात सरकारी पक्षाचा वेळकाढूपणाचं धोरण मुख्यमंत्र्यांना नोटीस देण्यात आलेली नाही, तोवर तात्काळ निर्णय देण्यात येऊ नये.


Post a comment

 
Top