0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारीच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत त्यांनी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचे बंड थंड करण्यात शरद पवारांना यश आले आणि त्यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता ते महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

Post a comment

 
Top