0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हयात गेली 15 वर्षे नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षीक अभियंता नानासाहेब पवार,कार्यकारी अभियंता प्रदिप दळवी,दिनेश महाजन व त्याच्या सहकारी अधिकारी कर्मचार्‍यांनी गेल्या 15 वर्षात 50 हजार कोटीच्या कामात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केला असुन त्यांच्या विरोधात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी माहिती अधिकारखालील माहिती अर्ज यातुन भ्रष्टाचार समोर येर्इल या भितीने त्यानीच कार्यालयातील कागदपत्र जाळली असावी असा संशय असुन कार्यालयातील आगीची चौकशी केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत व्हावी अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयात लागलेल्या आगीची चौकशी पोलिसांमार्फत करण्यात यावी.ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षीक अभियंता,तत्कालीन अधिक्षीक अभियंता,कार्यकारी अभियंता,तत्कालीन अभियंता,संबधित अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे यामध्ये नानासाहेब पवार,आर.टी.पाटील (अधिक्षैक अभियंता),कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी,अनिता परदेशी,बी.टी.बडे तसेच त्यांचे सहकारी अधिकारी यांच्या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आर.टी.आय कार्यकर्ते अनंत पटेकर व संदीप पवार यांनी अखंड साखळी उपोषण सुरू केले आहे.त्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे त्यांना ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ समन्वय समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी पाठिंबा व्यक्त केला असून या अथिकार्‍यांची र्इडी मार्फत चौकशी व्हावी त्यांना तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साटयालोटया कोटीच्या भ्रष्टाचार टक्केवाढीवर सत्ताधारी सार्वजनिक बांधकाम मंत्री,आमदार,खासदार,ठेकेदार दहशत गुंडेगिरी निर्माण करून राजकारण करत आहेत.
            तक्रारदाराच्या तक्रारीला केराची टोपली दाखवतात.माहिती अधिकारातील माहिती अधिकारी देत नाहीत,थातूर मातुर उत्तरे देतात यांच भ्रष्टाचारावर राजकीय घडामोडी घडतात.ठेकेदारारूपी कार्यकर्ते बलवान होतात त्यामुळे राज्यशासन सत्ताधारी कारवार्इ करत नाहीत याकडे पारदर्शक भाजपा केंद्र सरकारचे पंतप्रधान,गृहमंत्री,बांधकाम मंत्री यांनी लक्ष वेधावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.
            ठाणे जिल्हयात नॅशनल हायवे विभागात उपिअभयंता म्हणून प्रदीप दळवी कार्यरत होते तसेच आज ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन गेले 10 वर्षापासून ठाणे जिल्हयात थळ ठोकून आहेत तेच आज नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता आहेत,या दोघांच्या कालावधीत त्याचप्रमाणे नाना पवार यांच्या कालावधीत 100 कोटींचे 50 कोटींचे रस्ते 3 लाखापासून 25 ते 40 लाख,50 लाखांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे.कामे न करता बिले काढली आहेत.काही समाजसेवकांनी कोर्टात धाव घेतली आहे.निकृष्ट कामे केली जात आहेत.

            म्हसा-मुरबाड 48 कोटींच्या रस्त्यात 20 कोटीचा भ्रष्टाचार दिनेश महाजन यांनी केला आहे.या रस्त्यावर विद्दयुतपोल,पुल न करता बिले काढली आहेत हा पुरावा आहे त्याच रस्त्यावर 800 कोटीचा निकृष्ठ काम सुरू आहे अशा प्रकारे मुरबाड,कल्याण,शहापूर तालुक्यात प्रदीप दळवी आणि दिनेश महाजन यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे त्यांची चौकशी करावी म्हणून आम्ही तक्रारी शासनाकडे केल्या आहेत त्याची चौकशी भाजपा शिवसेना सरकारने दडपवली आहे याकडै केंद्र शासन लक्ष घालतील का ? (क्रमशः - भाग 1) ( पुढिल भागात - मुरबाड,कल्याण,शहापूर तालुक्यातील भ्रष्टाचार गाथा - भाग 2 मध्ये वाचण्यास विसरू नका)

Post a comment

 
Top