0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
संच कलामंच निर्मित "मुन्ना भाई सत्य आत्मा " या विनोदी नाटकाचा शुभारंभ नुकताच शिवाजी मंदिर , दादर (प) येथे विविध कलावंतांच्या संचात संपन्न झाला.
दिवसेंदिवस पृथ्वीवर पापाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे स्वर्ग वसाड पडला आहे त्यामुळे पृथ्वीच तेजस्वी रूप नष्ट झालं आहे, ज्यामुळे स्वर्गातील मानवी आत्मा  यम दरबारावर मोर्चा घेऊन जातात त्यमुळे  पृथ्वीवरील पाप-पुण्याचे प्रमाण समांतर कसे होते त्याचप्रमाणे यमदूत पृथ्वीवरून दोन जिवंत मानवाना यमदरबारात घेऊन येतो ते दोन मानव म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस आणि सरकीट या दोघांना यमराज पाप आणि पुण्याच प्रमाण समांतर करण्यासाठी काय वरदान देतो हे लेखक प्रभाकर मोहिते यांनी लिहिले असून चंदर पाटील यांनी ते विनोदी रूपात मांडले आहे. प्रत्येक कलावंतांने यांत जीव ओतून अभिनय केला असून नृत्य दिग्दर्शनची बाजू  संदीप येलवे यांनी पेलली आहे. या शुभारंभ प्रसंगी प्रसिद्ध विनोदी अभिनेता जयवंत भालेकर , दिग्दर्शक -पत्रकार महेश्वर तेटांबे, अभिनेता-निर्माते सुरेश डाळे-पाटील , आदी कलावंत उपस्थित होते .संच कलामंच ची अद्वितीय निर्मिती असलेली धमाल विनोदी कॉमेडी रसिक प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल हे नाटक पाहताक्षणी नक्की जाणवते

Post a comment

 
Top