0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
दिनांक १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सातारा येथे संपन्न झालेल्या ६५ व्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत बंटस संघास  मुंबईमधील पवई येथील एस.एम.शेट्टी हायस्कूलच्या वय वर्षे १४ वयोगटा अंतर्गत  मुलांनी  (धावपटूंनी) ४ x १०० मीटर रिले या क्रीडा प्रकारात दैदिप्यमान कामगिरी करून सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री अनिल रमेश पिसाळ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रिले संघातील मयुरेश बागायतकर, अक्षित जेठवा, जयूश शेट्टी व शाॅन गोन्सालविस या खेळाडूंचे शाळेतील विद्यार्थी , शिक्षक तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी कौतुक केले आहे आणि मुंबईतील सर्व क्रीडा स्तरावर या शाळेचे विशेष कौतुक केलं जात आहे.

Post a comment

 
Top