0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
राफेल विमान सौद्यात मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राफेल प्रकरणात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. या प्रकरणातील निकाल वाचताना सुप्रीम कोर्टाने व्यवहार प्रक्रियेतील अडचणीबद्दल याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद फेटाळले आहेत. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, या प्रकरणात कोणतीही एफआयआर नोंदविण्यात यावा किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी व्हावी, असे आम्हाला वाटत नाही. या प्रकरणात कराराचे काम सुरू आहे याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासह सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने केलेली चूक मान्य केली आहे.राफेल विमान व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाच्या 2018 च्या आदेशावरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि इतरांनी पुनर्विचार करण्याची याचिका दाखल केली होती. या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे.

Post a comment

 
Top