0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
तहसीलदार कार्यालयालयात तहसीलदार पदी शशिकांत गायकवाड यांची नियुक्ती झाल्यापासून  तालुक्यातील रॉयल्ट्री चोरी मध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ झाली  आहे  तलाठी आणि  मंडळ आधिकारी रॉयल्ट्री चोरांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करीत असतांना  त्यामध्ये  तहसीलदार गायकवाड  खो घालीत असल्याची चर्चा  महसुली  विभागात  केली जात आहे.प्रत्यक्षात  तहसीलदारांचे  आशिर्वाद मिळत असल्याने रॉयल्ट्री चोर मस्तवाल बनले आहेत. याची चौकशी करून कारवार्इची मागणी पत्रकार किरण निचिते यांनी केली आहे.भिवंडी तालुक्याच्या पडघा, अंबाडी आणी खारबाव   मंडळ  कार्यक्षेत्रात  खुप मोठ्या प्रमाणात माती आणि  दगड खाणी आहेत  भिवंडी  हा मुंबई  लगतचा  परिसर  असल्याने मुंबईच्या  बांधकामासाठी भिवंडी तालुक्यातुन  बांधकाम  साहित्य  पुरविले  जाते आहे.यामध्ये  डबर माती खडी  या साहित्याचा समावेश  आहे. या सर्व साहीत्यसाठी रॉयल्ट्री देण्याचे  काम तहसीलदार,प्रांत  आधिकारी  तसेच रेतीगट शाखा जिल्हाधिकारी  यांच्याकडुन केल जाते मात्र भरलेल्या  रॉयल्ट्री एव्हढेच  उत्खनन करण्यात आले किंवा कसे याबाबत खातरजमा करून  तसे अहवाल वरिष्ठ अधिकारी  यांना पाठविण्याचे काम मंडळ आधिकारी  आणी तलाठी  यांच्याकडु केले जाते.भिवंडीच्या तहसीलदार पदावर शशिकांत गायकवाड यांची नियुक्ती झाल्यापासून तालुक्यातील मंडळ आधिकारी आणि  तलाठी यांनी  रॉयल्ट्री चोरीबाबत विनापरवाना उत्खनन बाबत तहसिलदारांना असे अनेक अहवाल पाठवले आहेत, मात्र अशाप्रकारे आलेल्या अहवालावर भिवंडीच्या तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी  कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.  अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंडळ आधिकारी आणि तलाठी यांनी बेकायदेशीर उत्खननाबाबत पाठवलेल्या  अहवालावर तहसीलदार भिवंडी यांनी संबधीत रॉयल्ट्री  चोरांना  आणि जमीन मालकांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून उत्तर  मागायला हवे होते आणी समाधान कारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक होते, मात्र  अशाप्रकारे आलेल्या अहवालावर भिवंडीचे तहसीलदार गायकवाड यांनी कोणत्या स्वरूपाची कारवाई केली नाही. या सर्व प्रकारामुळे शासनाचे दोनशे कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे. शासनाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान कोणी विनाकारण करणे शक्य नाही, त्यामुळे या सर्व प्रकारामध्ये खुप मोठा भ्रष्टाचार आहे. या सर्व प्रकाराची  सखोल  चौकशी होणं आवश्यक असल्याचे किरण निचिते यांनी यावेळी आमच्याशी बोलताना सांगितले. यामध्ये आणखी महत्त्वाची बाब म्हणजे काही प्रकरणात संबधितांना नोटीसा काढुन म्हणेन मांडण्यास सांगीतले गेले, मात्र त्यानी समाधानकारक खुलासा केला नसतानाही त्यांच्यावरील कारवाई थांबविण्यात आली आहे यांची नेमकी कारणं काय हे फक्त तहसीलदार भिवंडी यांनाच माहीत.

Post a comment

 
Top