0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणावर आज शनिवारी सुप्रीम कोर्ट आपला ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी 10:30 वाजता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या प्रकरणावर आपला निर्णय देतील. रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी या प्रकरणाचा निकाल ते देणार आहेत. सलग 40 दिवस या प्रकरणावर सुनावणी झाली होती. यानंतर 16 ऑक्टोबरला सरन्यायाधीशांनी या प्रकरणावरचा निकाल राखीव ठेवला. अनेक दशकांपासून देशाचे राजकारण आणि समाजकारण अयोध्या प्रकरणामुळे ढवळून निघाले आहे. आज या ऐतिहासिक प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

Post a comment

 
Top