0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुरबाड शहरातील व्यापारी गाल्यासमोर उभे राहात असलेले अतिक्रमण प्रवाशाना जाण्यायेण्यासाठी आडथळा ठरतो दुकानासमोर पुढे शेड काढणे दुकानासमोर सामन लावणे यावर नगरपंचायत तसेच मुरबाड पोलिस संयुक्त कारवार्इ करणार आहेत.मुरबाड शहरात येणारी आवजड वाहाने यासाठी रात्री ते सकाळी साडेनऊ पर्यंत वेळ जाहिर केली असुन वाहानासाठी पार्किंग सोय केली आहे तेथे वाहने लावावीत अन्यथा कारवार्इ केली जार्इल असा इशारा व्यापारी बैठकीत नगरपंचायत मुख्यधिकारी कंकाळ तसेच वरिष्ठ पोलिस निरिक्षक बोराटे यांनी दिला आहे.फुटपथावर बसणार्‍यासाठी वेगळया जागेची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असुन शहराच्या रस्त्यामधील विद्युतपोल काढुन एका बाजुला लावण्यात येणार आहेत मर्यादित रिक्षा स्टॅन्ड ठेवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोेलिस निरिक्षक बोराटे यांनी दिली.नगरपंचायतीने सर्व दुकानासमोरील अवैध फुटपाथ दुकाने हातगाडया हाटवाव्यात अशी व्यापार्‍यानी मांगणी केल्याचे बैठकीत सांगण्यात आले यावेळी मोठया प्रमाणात व्यापारी पत्रकार तसेच नगरपंचायतीचे नगराध्यक्ष,बांधकाम सभापती,माजी उपनगराध्यक्ष सह नगरसेवक उपस्थित होते.


Post a comment

 
Top