0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती कार्यालय 1 एप्रिल 2020 पासून कागद विरहित तसेच 100 टक्के संगणीकरण करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.या अनुषगांने जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.या प्रकल्प अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना ,आमदार निधी, खासदार निधी,डोंगरी विकास कार्यक्रम,या सारख्या विविध योजनांच्या कामांना मान्यता देणे,निधी वितरीत करणे,त्याचे सर्वंकष मॉनेटरींग करणे,जी.पी.एस.लोकेशन टॅप करणे,कामाची प्रगती तपासणे,इत्यादी विविध बाबीचा समावेश आहे.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती स्तरावर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील यांच्या अधिपत्याखाली सर्व कर्मचाऱ्यांना समन्वय साधून दि.31 मार्च 2020 पर्यंत सदर प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सांगितले.यासाठी निवेदिता पाटील व संशोधन  सहायक दिपाली भोये ,यांना नाशिक येथे सर्वंकष प्रशिक्षण देण्यात आले असून दि.1 डिसेंबर 2019 पासून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात येत आहे.जिल्हा नियोजन समिती  कार्यालयाचे पुर्णत: संगणीकरण करुन कार्यालयातील कामकाज कागद विरहित (पेपरलेस) करण्याचे काम  नाशिक येथील ई.एस .डी .एस.लि.या कंपनीकडे  सोपविण्यात आले आहे.

Post a comment

 
Top