0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (2 नोव्हेंबर) अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेवरुन पेच तयार झाला आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीने चर्चेला उधाण आलं आहे.राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील घरी त्यांची भेट घेतली. ही भेट साधारण 10 मिनिटे चालली. मात्र, नेमके या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

Post a comment

 
Top