0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – हैदराबाद |
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका 26 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पशुवैद्य असलेली ही तरूणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना अढळून आला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेवर तेलंगणासह देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
बुधवारी रात्री तिची गाडी शहराच्या एका शांत भागामध्ये पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तशी कल्पनाही दिली. रात्री बराच उशीर झाल्याने घरच्यांनी तिला सुरक्षित जागेत थांबण्यास सांगण्यात आली. मात्र गाडीसोडून तिला कोणत्याही ठिकाणी जाता येत नव्हते. पंक्चर काढण्यासाठी तिने आजुबाजूला कुठे गॅरेज आहे का बघितले. तेवढ्यात बाजूच्या एरिआतील काही मुलांनी येऊन तिला मदतीसाठी विचारणा केली. यावेळी मदतीच्या बहाण्याने आलेल्या तिची मदत केली नाहीच पण तिच्यावर बलात्कार केला.
काही वेळानंतर प्रियंकाच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा फोन केला. मात्र नंतर तिचा फोन स्विच ऑफ आला. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने सांगितलेल्या जागेवर घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तिचा पत्ता लागला नाही. नंतर हैदराबाद-बंगळूर हायवेवर तिचा जळून राख झालेली मृतदेह सापडला. तिच्या कपड्यांवरुन आणि गळ्यातील गणपतीच्या लॉकेटवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटली.


Post a comment

 
Top