0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा "महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता" साकारली आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते 14 नोव्हेंबरला या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन होणार आहे.
प्रगती मैदान येथे दि.14 ते 27 नोव्हेंबर 2019 या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने 39 व्या ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने "व्यवसाय सुलभतेच्या माध्यमातून राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

Post a comment

 
Top