0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
राज्यात सत्ता स्थापनेचे घोंगडे अजूनही भीजत पडले आहे. दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजभवनावर जाणार आहे. शेतकरी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास मनसेचे नेते राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेटतील. या भेटीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी राज्यपालांकडे केली जाणार असल्याची माहिती समोर आली.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चार दिवसांपूर्वी राजभवनावर जाऊन राज्यपालांना भेटले होते. राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. यामध्ये अनेस शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तात्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. यानंतर आता मनसे राज्यपालांच्या भेटीला जात आहे.

Post a comment

 
Top