0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेची बैठक मुंबई विलेपार्ले येथे 23 नोव्हेंबर रोजी पार पडली. या बैठकीत कमलाकर केशव पाटील यांची महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कमलाकर पाटील हे नाव आता ठाणे शहर किंवा जिल्ह्यापुरते मर्यादीत राहिले नाही तर महाराष्ट्रासह देशाच्या 44 राज्यांत गेले आहे. पाटील हे सुपरिचित निरोगी शरीराने ईश्वरी वरदान आहे. भावी तरुण पिढी देशाचे उज्वल भविष्य आहे. के. के. पाटील यांनी ओळखले.  एकूणच त्यांनी ठाणे नव्हे देशातील प्रत्येक तरुण बळकट निरोगी सुदृढ असला पाहिजे, झाला पाहिजे, व्यायामाचे महत्व तरुणांना कळावे, त्याचा लाभ सर्वांना व्हावा, त्यासाठी त्यांनी आपली स्वतःची  अपोलो जिमची स्थापना करुन तरुणांना योग्य दिशा दाखवली. या जिममधून उत्तम प्रशिक्षक आणि उत्तम खेळाडू घडविले. राजेश जाधव (शिव छत्रपती पुरस्कार), संजय आंबेरकर(भारत श्रीमान), संतोष पाटील(भारत श्री), अजय पाटील ज्युनिअर(ऑलिम्पिक मिस्टर वर्ल्ड), उत्तम सालियन(पश्चिम भारत श्री), गिरीश शेट्टी(भारत श्री) असे अनेक उत्तम खेळाडू निर्माण झाले.
संघटना चालविताना खेळाडू निर्माण करताना निधी अपुरा पडतो. या निधीमधून क्रीडा शिबिराचे आयोजन केले जाते. खेळाडूंना स्पर्धेसाठी बाहेर जायचे असल्यास के. के. पाटील संघटनेच्यावतीने व स्वतः नेहमी मदत करत असतात.

कमलाकर पाटील हे शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य नाव आहे. त्यांनी गेल्या 15 वर्षांपासून ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्षपद भुषविले. गेली 10 वर्षे महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना व राष्ट्रीय हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे उपाध्यक्षपद भुषवित आहेत. तर 2011 ते 2015 रोजी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपोलो जिममध्ये नवतरुण खेळाडू घडत आहेत. महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील यांच्या बिनविरोध निवडीने ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Post a comment

 
Top