0
BY - प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ रंगकर्मी कलासेवकांचा सन्मान सोहळा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत माने, गजानन कराळे, तुळशीराम कदम हे सन्मानाचे मानकरी होते. यांच्यासोबत रवींद्र लाखे, सुरेखा गावंडे, संकेत पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. कल्याण मधील अनेक नामवंत कलाकारांनी आपली कला यावेळी सादर केली. लेखक वसंत कल्हापुरे यांच्या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. नाट्य परिषदेच्या वतीने शिवाजी शिंदे, रवींद्र सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a comment

 
Top