0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे महापालिका सभागृहात बिनविरोध म्हणून सेनेचा महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदी पल्लवी कदम यांची निवड झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली. 
यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत केलं.उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नगरसेवक यांचे आभार मानले. 
मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे  योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.तर दुसरीकडे शिवसेना आदेशाने चालणारा पक्ष आहे, शिवसेनेला जाणीव आहे कोणीही आमदार फुटणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Post a comment

 
Top