0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मुरबाडमधील गेल्या काही वर्षापासून श्री समर्थ सुपर बाजार मॉल मुरबाड तालुक्यातील गरिब गरजू लोकांना अवघ्या कमी किमंतीत तसेच घरपोच सवलती देत आली आहे.मुरबाडमध्ये नामवंत ठरलेली व मुरबाडच्या तरूणांना उद्दयोगसमुहातून रोजगार मिळवून देणारा श्री समर्थ सुपर बाजार मॉल एकमेव एतिहासिक ठरला आहे.मुरबाडच्या नागरिकांना कमी सवलती कमी दरात आणि वाजवी भावात मार्केट मॉल उभा करण्यात आला असून मोठया उत्साहाने श्री समर्थ सुपर बाजार मॉलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.श्री समर्थ सुपर बाजार मॉलमध्ये मोठया प्रमाणात विविध प्रकारचे स्कीम,ऑफरच्या माध्यमातून राबविली जाते.नागरिकांना मान सन्मान श्री समर्थ सुपर बाजार देत असून परत आलेल्या वस्तूवर अटी तटी लावल्या जात नाही हे प्रमुख वैशिष्ट ठरले आहे.एक फोन आणि घरपोच वस्तु अशी संकल्पना श्री समर्थ सुपर बाजार मॉलने सुरूवात केली आणि आज तालूक्याच्या केंद्रबिंदूतून मानबिंदू श्री समर्थ सुपर बाजार मॉलने प्राप्त केला.नुसते व्यवसायच करायचे नाही तर नक्षत्राचं देणं म्हणून आपल्या कौटूंबिक ग्राहकाला भेट स्वरूप म्हणून विविध उपक्रम राबवून आनंद क्षण देण्याचा मानस श्री समर्थ सुपर बाजार चे प्रदोष हिंदुराव यांनी केला आहे.
आगळा वेगळा उपक्रम मुरबाड सारख्या भागात राबविणे म्हणजे छोटी गोष्ट नसून नैतिकता आणि माणूसकी टिकवणारी आहे असेच म्हणावे लागेल.अशी माणूसकी प्रदोष हिंदूराव यांनी श्री समर्थ सुपर बाजार मॉलच्या माध्यमातून टिकवली आहे.मुरबाडकरांनी मुरबाडच्या व्यवसायाला भरभरून प्रतिसाद दिल्याने मुरबाडचा व्यवासायिक उंचगरूड झेप घेतांना दिसत असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.मुरबाडचा उपक्रम श्री समर्थ सुपर बाजार मॉलने दिपावली निमित्त राबविला असून यामध्ये विविध स्कीम होत्या त्यामध्ये 12 महिण्यांच्या सामान खरेदीवर एका महिण्यांचे सामान मोफत,चोवीशेच्या खरेदीवर घरगुती सामान मोफत तर त्याचबरोबर 555 च्या लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून चिठ्ठया सोडत राबवून प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला नविन टि.व्ही.एस ज्युपिटर तसे उर्वरित 30 जणांना विविध बक्षिसे असा बंपर ऑफर धमाका राबवत कार्यक्रामाचे आयोजन केले होते.यावेळी मुरबाडकरांना अनोख्या दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला नामवंत असे प्रमुख पाहुणे,सामाजिक कार्यकर्ते,विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांक आलेल्या भाग्यवंत पुरूषोत्तम मंडलिक यांना ज्यपिटरची चावी देऊन बक्षिस देऊन गौरविण्यात आले.प्रदोष हिंदुराव यांच्या कार्यशैलीला श्री समर्थ सुपर बाजार मॉलच्या माध्यमातून मुरबाडमध्ये मानाचा तुरा फुलला आहे.


Post a comment

 
Top