0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची  तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना रातोरात राष्ट्रपती राजवट हटवली गेली. इतकंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडला.
या सर्व पार्श्वभूमीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर हल्लाबोल केला.  अजित पवारांनी रात्रीत पाप केलं आहे. ते नजरेला नजर मिळवत नव्हते. अंधारातील पाप अंधारात नष्ट होईल, शरद पवारांचा यामागे काही हात नाही हा माझा विश्वास आहे असं संजय राऊत म्हणाले.

Post a comment

 
Top