0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालावर आज (9 नोव्हेंबर) सकाळी 11.15 च्या सुमारास अंतिम निर्णय दिला गेला. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी नियम बनवा असे आदेश सर्वाच्च न्यायलयाने केंद्राला दिले आहे. एखादी ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा असेही नमूद केले आहे. तसेच मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार आहे.

Post a comment

 
Top