0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
बुलढाणा जिल्हयातील वडनेर भोळाजी येथील शेतकरी आबादास मोरे यांना बँक मॅनेजर वाघमारे नाजुरा यांनी अधिक कर्जबाजारी बनवले सावकारानी कर्जा पोटीपिक नेले सरकारने नुकसान भरपार्इसाठी रडवले अशा दुष्काळस्थितीत त्यांच्या दिपावलीला आलेल्या पाच मुली त्यांच्या कुटुंबीयाना गोडधौड खावू घालू शकले नाही अशा व्यथात शेतकरी बाप रडला अशा शेतकर्‍याना सरकारने बुलढाणा जिल्हाधिकार्‍याने न्याय दयावा अशी मांगणी होत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाची पहाणी विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ शेलार त्यांचे पदाधिकारी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी आमरावती ,दर्यापुर, आकोला,बुलढाणा,औरगांबाद, अहमदनगर,पैठण,नाजुरा वडनेर या परिसरातील शेती नुकसाणीची पहाणी करून शासनाच्या समस्या जाणुन घेतल्या शेतकर्‍याशी चर्चा केली. त्यावेळी गंभीर समस्या बाहेर आल्या आहेत सरकारने अशा नुकसानग्रस्त शेतकर्‍याना हेक्टरी 50 हजार भरपार्इ दयावी पिकविम्याचे पैसे दयावेत सातबारा कोरा करावा अशा मांगण्या शेतकरी आबादास मोरे गजानन वैधकार सोपान पाटील अन्य शेकडो शेतकर्‍यांनी केला आहेत.
सरकारने आम्हा शेतकर्‍याची थट्टा करू नये आमचा सातबारा कोरा करावा पिकविम्याचे पैसे दयावेत 50 हजार हेक्टरी नुकसान भरपार्इ दयावी बेरोजगाराना नोकर्‍या दयाव्यात अन्यथा आम्ही तरूण रस्त्यावर येवू उग्ररूप धारणकरू असा इशारा सोपान पाटील यांनी दिला आहे.
पिकाची खरेदी केंन्द्र सुरू करा : हमी भाव दया
अवप सरकारने हमीभाव केंन्द्र सुरू केलेले नाहीत शेतकर्‍याना त्याचा मोठा फटका बसला आहे.खाजगी खरेदीदार दलाल कापुस सोयाबीन तुर अन्य पिकाची अल्पदरात खरेदी करतात त्यामुळे शेतकर्‍याना शासनाच्या हमीभाव अनुदानाचा फायदा होत नाही अवप हमीभाव केंन्द्र सुरू झालेले नाहीत याकडे संबधित प्रशासनाने लक्ष वेधावे
वावरात शेतावर जाण्यासाठी रस्ते हवेत
वावरात असणारी पिके ओल्या दुष्काळाने कुजली आहेत शेतात कुजलेले पडलेले पिके काढण्यासाठी रस्ते नाहीत डॉक्टर चिखलात आडकतात माणसाना जाता येत नाही अशा ठिकाणी शेतकरी स्वता रस्त्यासाठी जमीन देण्यास उत्सुक असुन शासन वापराच्या रस्त्यासाठी शेताकडे जाणार्‍या दांड रस्ते पाऊलवाटा साठी पुढाकार घेत नाहीत रोजगार हमी मधुन शेतकरी रस्ते पाऊलवाटा साठी पुढाकार घेत नाहीत रोजगारहमी मधुन शेतकरी रस्ते तयार करण्यास उत्सुक आहेत.त्यामध्ये त्याना रोजगारही उपलब्ध होर्इल मात्र शासनाचा निधी येतो कोठे जातो कोठे यांची माहिती गुलदस्त्यात असुन वडनेर नाजुरा सह विदर्भ मराठवाडयातील शेतकर्‍याच्या शेतावर रस्ते व्हावेत अशी मांगणी वडनेर भोळाजीचे शेतकरी आबादास मोरे सोपान पाटील यांनी केले आहे.नाजुरा येथील बँक मॅनेजर वाघमारे यांनी मला पिकविमा भरायाला लावले तुम्हाला कर्जमाफी झाली सांगितले.आणि कर्ज काढुन दोन लाख घेतले मात्र मला कर्जमाफी झाली नाही माझी फसवणुक झाली त्यातुन मी अधिक कर्जबाजारी झालो असुन खाजगी सावकारला शेतात आलेले पिक कर्जापोटी दयावे लागत असल्याची माहिती आबादास मोरे वडनेर भोळाजी यांनी आमच्याशी बोलताना दिली.आमरावती,दर्यापुर,आकोला,बुलढाणा,औरगांबाद, पैठण या परिसरातील शेतकरी साताबारा कोरा करून 50 हजार रूपये हेक्टरी दयावेत या प्रतिक्षेत आहेत.राष्ट्रपती राजवटीत जाहिर केलेली 8 हजाराची तुटपुंजी मदत आम्हाला नको सोयाबीन एक एकर लागवडीसाठी 30 हजार तर एक हेक्टरी 70 हजार खर्च होता मग आठ हजारात आम्ही काय करणार.येथील शेतकरी वैतागुन शेती विक्री करत आहे.दुसरीकडे नोकर्‍या नाहीत रोजगाराचं साधन नाही मुलांचे शिक्षण मुलामुलींचे लग्न आरोग्यासह अन्य समस्याने येथील शेतकरी ग्रासला आहे.याकडे शासनाने लक्ष वेधून शेतकर्‍याना न्याय दयावा अशी मांगणी विकासमंचच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ शेलार यांनी केली आहे.

Post a comment

 
Top