0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
जिल्हा वार्षिक योजनेतील वर्ष २०१९-२० च्या कामांच्या तांत्रिक, प्रशासकीय मान्यता संबंधित सर्व यंत्रणांनी तत्काळ घ्याव्यात. जेथे निविदा काढायच्या असतील, त्यांची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेतील कामे वेळेत सुरू करा, ज्या विभागांचा निधी अखर्चित राहणार असेल त्यांनी निधी  तातडीने शासनजमा  करण्याचा प्रस्ताव  सादर करावा  असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी विविध  विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.  तसेच  निधी वेळेत खर्च होईल, या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे,' अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  समिती सभागृहात  जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेच्या विविध यंत्रणांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल  खंडारे , समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद  खैरनार , यांसह विविध  विभागांचे अधिकारी   उपस्थित होते.पाऊस, निवडणूक यामुळे  आर्थिक वर्षात निधी  खर्च होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. 'लोककल्याणाच्या योजनांच्या अनुषंगाने यंत्रणांना प्राप्त झालेला निधी त्यांनी वेळेत खर्च करणे आवश्यक आहे.  सर्व विभागांनी  प्रस्ताव ३० नोव्हेंबर पर्यत सादर करावेत. त्यासाठी  आवश्यक प्रक्रिया पार पाडावी.आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, रस्ते विकास, समाजकल्याण, या विभागांनी त्यांची कामे वेळेत मार्गी लागण्यासाठी योग्य नियोजन करावे,' असेही श्री नार्वेकर यांनी सांगितले.

     या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष २०१९-२० साठी शासनने  मंजूर केलेल्या निधीच्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.'ज्या विभागांना निधी मंजूर झाला आहे, मात्र, संबंधित विभागाकडून  अद्याप कुठल्याही प्रकारचे मान्यतेचे प्रस्ताव सादर केलेले नाही त्या सर्व विभागांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची  कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. अखर्चित असलेला  निधी तातडीने  नियोजन समितीकडे   समर्पित करणारे   प्रस्ताव सादर करावेत,  जेणेकरून ज्या यंत्रणांना निधीची आवश्यकता असेल, त्यांना तो निधी देण्यात येईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a comment

 
Top