0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
नुकतीच मुंबई मधील सेंट जोसेफ हायस्कूल वडाळा येथे रेजुवेंनेटर्स ही फुटबॉल टुर्नामेंट आयोजित केली होती, या फुटबॉल टुर्नामेंट मध्ये साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या शाळेतील " एज्यूको फाउंडेशनच्या " १४ वर्षा खालील मुलींनी ४ गोल करून आपल्या विरुद्ध संघाला "आकांक्षा फाउंडेशन" ला पराभूत करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला.  "आकांक्षा फाउंडेशन" च्या टीम ने फक्त १ गोल केल्यामुळे या टीमला ४ -१ असा पराभव पत्करावा लागला. एज्यूको संघाची कर्णधार कु. प्रियंका कनोजीया हिने २ गोल केले, तर कु. आदीती पंदीरे आणि कु. संध्या बिंद यांनी प्रत्येकी १ - १ एक गोल करत संघाला विजय प्राप्त करून दिला. कु.आदीती पंदीरे हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक जाहीर करण्यात आले, प्रियंका कनोजीया हिला गोल्डन बूट चा पुरस्कार जाहीर करण्यात आला तर वेदश्री मेस्त्रीला "बेस्ट गोल किपर " हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रीडा शिक्षक योगेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे प्रशिक्षक छगन चौहान व तुषार चव्हाण यांनी खेळाडूंना 
विजय संपादन करण्यासाठी अतीशय परिश्रम घेतले. प्रशिक्षक छगन चौहान  यांना मुलींच्या संघासाठी उत्कृष्ट फुटबॉल प्रशिक्षक तर तुषार चव्हाण यांना मुलांच्या संघासाठी उत्कृष्ट फुटबॉल प्रशिक्षक म्हणून गौरविण्यात आले. संघाला विजयी करण्यासाठी प्रियंका कनोजीया, आदिती मेस्त्री, कशक सिंह, तन्वी चव्हाण, गौरी शुक्ला, संध्या बिंद, स्नेहा सोलंकी, करीना पंदीरे, प्राजक्ता गोसावी, यांनी कठोर परिश्रम घेऊन संघाला विजय मिळवून दिला, विजयी संघाचे मुंबईत सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top