0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होत आहे. दरम्यान गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबच उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री असणार अशा सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांच्या नावाची चर्चा आहे.
अजित पवारांनी नुकताच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शनिवारी सकाळी शपथविधी उरकला. यानंतर राजकारणात मोठा भूकंप झाला. अनेक घडामोडी घडल्यानंतर अजित पवारांनी मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे झाले तर एकाच आठवड्यात अजित पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

Post a Comment

 
Top