0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मागील काही वर्षात अन्न भेसळ औषध प्रशासन कार्यालयाची मुरबाड शहरामध्ये कुठलीच कारवाही नाही.गुटखा विक्रेता व अधिकारी यांच्यामध्ये संगतमत आहे त्यामुळे मुरबाड तालुक्यात गुटखा धंदा राजरोस सुरू आहे किराणा दुकान, पान टपरी, इत्यादी ठिकाणी खुले आम जास्त भावाने गुटखा विक्री सुरू असुन मात्र अन्न भेसळ औषध प्रशासनाचे अधिकारी मात्र काना डोळा होत असताना दिसत आहे. मुरबाडमधूनच होलसेल गुटखा विक्री होऊन तो तालुका व बाहेर ठिकानी विक्री होत आहे.विशेष म्हणजे अन्न भेसळ औषध प्रशासनचे अधिकारी व पोलिस प्रशासनांनी गेल्या काही वर्षाासून एकाही गुटखा विक्री विरोधात व डिलर विरोधात कारवाही न केल्याने गुटख्याच्या वाढत्या ओघामुळे युवक वर्गांना विविध रोगांना सामोरे जाऊन फुफ्फुसे खराब होऊन आपला जीव घालवणार असून याला जबाबदार अन्न भेसळ औषध प्रशासनचे अधिकारी व पोलिस प्रशासनच असतील असा आरोप येथिल जनता करित आहे.
मुरबाडच्या मशिनीत गुटखा बनावट बनविला जात असून गुटख्यात करणार्‍या केमीकल मिश्रीतमुळे लहानग्या पासून तरूणांपर्यत गुटक्याचं व्यसन जास्त प्रमाणात वाढले असून कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागणार आहे.मुरबाड तालुक्यातील व शहरातील गुटखा डिलरने हप्तेबाजीचा सुर उमटवला असून अन्न भेसळ औषध प्रशासनचे अधिकारी व पोलिस प्रशासनांच्या हलगर्जीपणामुळे व मिलीभगतीने मुख्य भागात रोजरोस गुटखा विकला जातो परंतू कारवार्इ केली जात नाही ही खेदजनक बाब आहे.यावर कारवार्इ का होत नाही असा आरोपही जनतेने केला असून पोलिस अधिक्षीकांच्या समोर वृत्त येत असतानाही चौकशी करून डिलरवर प्रशासकाचे दबाव आणले जात नाही.गुटखा विक्रेत्यांवर कारवार्इ होणार का ? कधी होणार कारवार्इ की हप्तेबाजीच्या पाग्डयामुळे प्रशासन बघ्याचीच भुमिका घेणार असा सवाल येथिल नागरिक करित आहे.याकडे अन्न भेसळ औषध प्रशासनचे अधिकारी व पोलिस प्रशासन कारवाईची काय भूमिका घेणार की बातम्या येऊन आपल्या हप्तेबाजीला वाढवणार असा संताप व्यक्त होत असून प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार असा प्रश्‍न प्रत्येकाच्या समोर आला आहे.

Post a comment

 
Top