0
BY - प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण अटाळी मधील अखंड हरिनाम महोत्सव समिती व ग्रामस्थ मंडळ आयोजित श्री ग्रंथराज पारायण आणि अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन सालाबादप्रमाणे आंबिवली अटाळी हनुमान मंदिर येथे करण्यात आले आहे. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. बुधवार 27 नोव्हेंबर ला सुरू झालेला सोहळा शनिवार 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असून रोज भजन, कीर्तन, अन्नदान तसेच ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
ह.भ.प. अंबादास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. गजानन पाटील, दशरथ तरे, मारुती पाटील, अरुण भोईर, एंटक पाटील, रमेश पाटील, रतन पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत भगत, दशरथ पाटील, कैलास पाटील, ऋषिकांत पाटील, रुपेश पाटील, विशाल पाटील तसेच समिती चे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली

Post a Comment

 
Top