0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घटना घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाकडे ११९ आमदारांचं पाठबळ होत. त्यांना आणखी २६ आमदारांची गरज होती. त्यात राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते अजित पवार भाजपासोबत गेले आहेत. त्यामुळे याला राष्ट्रवादीची फूस आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे शरद पवार हे सर्व आमदारांना फोन करत आहेत.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.  कोणते आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत याची चाचपणी केली जात आहे. अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेस-शिवसेनेच्या नेत्यांना धक्का मानला जात आहे.  

Post a comment

 
Top