0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सोलापूर  |

अक्कलकोटच्या रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ मुंबईहून अक्कलकोटकडे निघालेल्या भरधाव चारचाकीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तीन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर अपघातग्रस्त ट्रक क्रमांक (एम एच 12 के पी 7971) हा चुरमुरे घेऊन अक्कलकोटकडे निघाला होता. अक्कलकोटनजीक रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ काँक्रीट रोड संपल्यामुळे ट्रक चालकाने ट्रकचा वेग कमी केला, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या चारचाकी (एम एच 02 बी जे 5817) या जीपने ट्रकला जोराची धडक दिली.

Post a comment

 
Top