0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबईकरांना आतापर्यंत पेंग्विनचे केवळ दर्शन मिळत होते. आता त्यांना त्यांचा आवाजही ऐकता येणार आहे. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई प्राणिसंग्रहालयामध्ये देशी थाटात राहणाऱ्या ऑलिव्ह, पोपाय, बबल, मिस्टर मॉल्ट, डोनाल्ड, हम्बोल्ट आणि डेझी या परदेशी मित्रपरिवारातील संवाद आता पर्यटकांना प्रत्यक्ष ऐकायला मिळणार आहे. यासाठी पेंग्विनच्या दालनात अद्ययावत ध्वनिप्रणाली बसवण्याचा निर्णय मुंबई पालिकेकडून घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या निर्णयावर अजूनही अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. तरी लवकरच त्याची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Post a comment

 
Top