0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
प्रधानमंत्री  किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थीची माहिती आधार कार्डशी संलग्न करुन दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत हि शनिवार दि .30 नोव्हेबर 2019 देण्यात आली आहे. त्या करीता  या योजनेच्या पी.एम.किसान पोर्टलवर Farmers Corner मध्ये Edit Aadhaar Failure Records ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.या सुविधेमार्फत  योजनेच्या पात्र लाभार्थांना पोर्टलवर जाऊन स्वत: त्यामध्ये दुरुस्ती करता येईल.
तसेच http://www.pmkisan.gov.in/Home.aspx  या संकेत स्थळावर CSC LOGIN या सुविधेमध्ये आपल्या जवळील  आपले सरकार सेवा केंद्र (सामायीक सुविधा केंद्र) ला भेट देऊन पात्र लाभार्थी त्यांची आधारकार्ड आधारीत माहिती दुरुस्ती करू शकतील. ज्या पात्र लाभार्थांनी आधारकार्डशी संलग्न माहिती मध्ये दुरुस्ती केली नसेल त्यांना दि.1 डिसेंबर 2019  पासुन या योजनेचा लाभ देता येणार नाही. त्यामुळे लाभार्थांना आधारकार्ड संलग्न माहिती तात्काळ दुरुस्त  करण्याचे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी केले आहे .


Post a comment

 
Top