0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य नगर - सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे मार्गदशर्नाखाली लोकमान्य नगर, सावरकर नगर व हनुमान नगर या हजेरी शेड परिसरातील नागरिकांच्या घरो घरी जाऊन घरातील कचरा संकलन करताना ओला कचरा हा हिरवा रंग डब्बा व सुका कचरा हा निळा रंग डब्बा तसेच घातक कचरा हा लाल रंगाच्या डब्यामध्ये टाकणे संदर्भात उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. परिसर स्वच्छ व सुंदर दिसेल. आपल्या शहराचे मानांकन सुधारेल व शहराची ओळख स्वच्छ शहरामध्ये होईल.
या बचत गटामध्ये घे भरारी महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री माने,  प्राची शिर्के, झेप महिला बचत गटाच्या अध्यक्षा तेजस्विनी पांगम,  सुप्रिया चव्हाण, यशस्विनी सेवा भावी संस्थेचे अध्यक्षा संपदा पांचाळ तसेच ममता चौरे यांनी पुढाकार घेतला आहे. या महिला बचत गट व महिला मंडळाना प्रोत्साहन देवून त्यांच्यामध्ये स्वयं स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी तसेच परिसरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करणे म्हणून या सर्व कचरा सेवक महिला बचत गट व महिला मंडळाच्या अध्यक्षांसह सभासदांचा ठाणे महानगरपालिकेचे सहा.आयुक्त  शाम होळकर, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत पष्टे, स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी, अजय जगताप, मोहन कांबळे, बबन कापडी व शाळा क्र. १२० चे मुख्याध्यापक सुरेश संखे सर याचे मार्फत सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित जन समुदायाला श्याम होळकर, यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

 
Top