0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यातील गेले 11 दिवस सुरू असलेल्या सत्ता स्थापनेबाबतची कोंडी सुटण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू होतील, असे संकेत शहा-फडणवीस भेटीनंतर मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहा-फडणवीस भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नसला, तरी शिवेसनेने केलेल्या मागण्यांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Post a comment

 
Top