0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
तालुक्यातील आजूबाजूच्या गावात जनजागृतीचा प्रभाव आपणा सर्वांना पाहायला मिळत आहे, ह्याच अनुषंगाने माझं गाव...माझी जबाबदारी...या संकल्पनेतून माझं गाव आदर्श व सुजलाम सुफलाम होण्यासाठी गावात एकोपेचे वातावरण तयार करण्यासाठी , गावातील बांधव प्रशिक्षित झाले तर गाव विकास चळवळ अधिक बळकटशाली होईल या हेतूने रोवळे ग्रामविकास मंडळ मुंबई -रजिस्टर यांच्या माध्यमातून गाव विकास चळवळ आणि ओबीसी जातनिहाय जनगणना व्याख्यान मार्गदर्शन शिबीर , दि.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी, कुणबी ज्ञातीगृह वाघे हॉल , परेल मुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. 
सुरुवातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.गावात जेष्टवरिष्ठांसोबत कशाप्रकारे योगदान दिले पाहिजे, चांगली बाजू × न्यायी बाजू , व्यक्तीगत स्वार्थ × समाजिक स्वार्थ, सामाजिक अजेंडा महत्वाचा × पक्षाचा अजेंडा महत्वाचा यमाधलं फरक यामधलं फरक ,मान अपमान सहन करायला आपण शिकलो पाहिजे, गावातील जेष्टांच्या अनुभवाने युवकांची शक्ती एकवटली तर गावांमध्ये क्रांती प्रगल्भ होईल, ज्या गावात जन्म घेतला त्या गावात आपले नाव टिकवून राहिले पाहिजे असं वाटतं असेल तर व्यक्तीनिरपेक्ष असणे गरजेचे आहे,  गावचा विकास गावातील दोन पिढ्या हातात-हात घालून करतील तर गावाचा विकास होईल , समाजगामध्ये , गावामध्ये एकनिष्टेने काम केलं पाहिजे आणि सगळ्यात गावची अस्मिता सर्वांनी जपवून ठेवली पाहिजे ,गावांत काम करतांना पराकोटीचा संयम बाळगून काम करणे त्याच बरोबर ओबीसी जातनिहाय जनगणना विषयांवर ओबीसी म्हणजे कोण ?? ओबीसींची या देशातील ग्रामपंचायतमध्ये कोणती ओळख असायला हवी ?? इंग्रजांच्या राजवटीत ओबीसींची जनगणना होयाची पण आता का नाही ?? ओबीसीं जातनिहाय जनगणना करण्यात यावी व स्वतंत्र रखना असायला हवा ?? ओबीसींना कशाप्रकारे डावलली जाते ?? ओबीसी घटकांची 2021 जातनिहाय जनगणना झाली तर काय होईल ?? अशा ओबीसीच्या अनेक मुद्यांवर प्रमुख वक्ते प्रा. सुनील देवरे सर यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष मा. हरिश्चंद्र सुर्वे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर सूत्रसंचालन सरचिटणीस मा. हरिश्चंद्र म्हातले साहेब यांच्या सहकार्याने त्याच बरोबर प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनील देवरे सर आणि उपस्थित मान्यवर कुणबी शाखा तळा अध्यक्ष मा. सुरेश कावनकर साहेब यांना सन्मानित करून कार्यक्रमाची प्रस्तावना मा. पूर्वांग तांदलेकर साहेब यांनी वाचून त्याचप्रमाणे कार्यक्रमाची सांगता उपाध्यक्ष मा.दिनेश डिके साहेब यांनी उपस्थित मंडळाचे आजी माजी , मध्यवर्ती पदाधिकारी, कार्यकर्णी, जेष्ठ-वरिष्ठ, युवक-युवती, प्रमुख मान्यवर यांचे आभार मांडून केले..

Post a comment

 
Top