0
BY -  युवा महाराष्ट्र लाइव – परंडा/प्रतिनिधी |
शिराळा ग्रामपंचायत कार्यालयास परंडा येथील शिक्षणमहर्षी गुरूवर्य  रा.घे.शिंदे कॉलेज मधील राज्यशात्र विभागाकडून गाव भेट दौरा करण्यास आला.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी गावाची संपुर्ण पाहणी केली. यावेळी शिंदे कॉलेजचे प्रा. डॉ.विशाल जाधव सर तसेच प्रा.निखील आडसुळे सर उपस्थित होते.  यावेळी राज्यशात्र विभाग प्रमुख प्रा. विशाल जाधव सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्व राजकीय व सामाजिक जाणिवेतून विद्यार्थी घडावे.अशी भावना व्यक्त केली.  या उपक्रमाचे सर्व गावकर्याकडून कौतुक करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिराळा गावाचे सरपंच रेवण ढोरे ग्रामसेवक गायकवाड सर व तलाठी चुकेवाड  तसेच गावातील सर्व गावकरी उपस्थित होते.

Post a comment

 
Top