0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची, जागेची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकांची निकोप वाढ व्हावी यासाठी लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्येशाने जिल्हा पुरस्कार  देण्यात येणार आहे.शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे जिल्हा सल्लागार समितीद्वारे छाननी करुन प्राप्त अर्जामधून निवड करण्यांत आलेल्या उत्कृष्ट लघु उद्योजकांना  योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्यास प्रथम पारितोषिक रु. 15,000 हजार  द्वितीय पारितोषिक रु. 10,000 हजार  तसेच मानचिन्ह सत्कारपूर्वक प्रदान करण्यांत येणार आहे.   
ज्या घटकांना यापूर्वी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत असे घटक या पुरस्कारासाठी पात्र होणार नाहीत.घटक उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या लघु उद्योग म्हणून नोंदणीकृत झालेले असावे.मागील 2 वर्षात सलग उत्पादन करीत असणारे घटक अर्ज करण्यास पात्र आहेत.अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

उद्योजकांनी सन 2019 चे पुरस्कार निवडीकरिता व योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी विहीत नमुन्यात अर्ज व कागदपत्रे  जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी कमर्शियल कॉम्प्लेक्स बिल्डींग, 1 ला मजला मुलुंड चेक नाका (एलबीएस मार्ग) वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे पश्चिम, 400 604 येथे कार्यालयीन  वेळेत दिनांक 15डिसेंबर 2019 पर्यंत सादर करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र ठाणे श्रीमती वृषाली बी. सोने यांनी केले आहे.Post a comment

 
Top