0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दहा दिवस उलटले आहे. भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. मात्र अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसलेली आहे. तर भाजप पद सोडायला तयार नाही. दरम्यान राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.

Post a comment

 
Top