0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली । 
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. महाराष्ट्रात खासकरून शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अजेंड्यामध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला होता.आज लोकसभेत सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भारतरत्न पुरस्कारासाठी अनेक शिफारशी येत असतात. मात्र सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. योग्यवेळीच भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जातो, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Post a comment

 
Top